मुंबई महापालिका आणि आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना राज्यातील नवीन शिंदे- फडणवीस सरकारने सरसकट २२,५०० रुपये एवढी सानुग्रह अनुदानाची रक्कम दिवाळी भेट म्हणून २९ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर केली. परंतु सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करून २० दिवस उलटत आले तरी महापालिका कर्मचाऱ्यांच्या हाती ही रक्कम पडली ना त्यांच्या बँकेच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. एरव्ही दिवाळीच्या दोन चार दिवसांपर्यंत सानुग्रह अनुदानाचा तिढा सुटायला वेळ लागत होता आणि सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये बोनसची रक्कम जमा व्हायची. परंतु २० दिवस उलटत आले तरी महापालिका प्रशासनाला कर्मचाऱ्यांना घोषणा झाल्यानंतर त्वरीत ही रक्कम देऊन कर्मचाऱ्यांना आपल्या मुलाबाळांना दिवाळीची खरेदी करण्यासाठी देण्याची प्रशासनाची तेवढा मनाचा मोठेपणा दाखवल्याचे दिसत नाही.
( हेही वाचा : हलाल विरोधी अभियानात सामील व्हा! सर्व देशभक्त पक्ष-संघटनांना हलाल विरोधी कृती समितीचे आवाहन )
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त यापूर्वीच्या २० हजार एवढ्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेत अडीच हजार रुपयांची वाढ दर्शवून यंदाच्या दिवाळीमध्ये २२ हजार ५०० रुपये एवढी रक्कम देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या समन्वय समितीचे पदाधिकारी व महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल तसेच अतिरिक्त आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत जाहीर केले. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांनाही यावर्षी २२हजार ५०० रुपये एवढी सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्याची घोषणा केली. परंतु २० दिवस उलटत आले तरी या सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा मागील आठवड्यात प्राप्त होणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर मागील शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना आपल्या मुलाबाळांसाठी तसेच दिवाळीची अन्य खरेदी करता आली असती. परंतु प्रशासनाला ही रक्कम देण्यासाठी दिवाळीचा आदला दिवस उजाडण्याची वाट पहावी लागत आहे.
महापालिकेतील एक लाख ५ हजार कर्मचाऱ्यांपैंकी सर्वांत जास्त कर्मचारी वर्ग हा चतुर्थ श्रेणीतील असून या गरीब कामगारासाठी सानुग्रह अनुदानाची रक्कम महत्वाची असते. त्यांची दिवाळी ही रकमेवरच असते. परंतु राज्यातील दिलदार असलेल्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करून कामगार,कर्मचाऱ्यांना दिलासा दिला असला तरी महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची वृत्ती ही कामगारांना ही रक्कम दिवाळीपूर्वी देण्याची नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने १८ ऑक्टोबर रोजी सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले असले तरी याबाबतच्या फाईलवर अद्यापही स्वाक्षरी झालेली नाही. त्यामुळे जर ही स्वाक्षरी बुधवारी झाल्यास शुक्रवारपर्यंत ही रक्कम मिळू शकते. त्यामुळे कामगार आणि कर्मचाऱ्यांना ही रक्कम कधी मिळणार आणि ते कधी दिवाळीची खरेदी करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community