हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे वाशी आणि पनवेल येथे ‘हलाल मुक्त दिवाळी’ आंदोलन!

200

मॅकडोनल्ड्स, KFC, बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारख्या नामवंत कंपन्या हिंदू, जैन, शीख समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकत आहेत. भारतातील 15 टक्के मुसलमान समाजासाठी 80 टक्के हिंदु समाजावरील हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. या अघोषित हलाल सक्तीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने वाशी सेक्टर 17 येथील ‘मैकडोनाल्ड’च्या समोर आणि पनवेल येथील ओरीऑन मॉलच्या जवळ ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. तसेच शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

( हेही वाचा : महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी शिल्प कलेतून साकारले ‘शिववैभव किल्ले’)

New Project 10 5

गेल्या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्लिम देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत. मुळात भारत सरकारच्या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? हिंदूंना धर्मस्वातंत्र्य नाही का, ग्राहक म्हणून अधिकारी नाही का, भारताला धर्मनिरपेक्ष म्हणायचे आणि धर्माच्या आधारावर उत्पादनांच्या इस्लामी प्रमाणिकरणाचा घाट घालायचा, हा काय प्रकार आहे ? असे प्रश्न यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधीकडून उपस्थित करण्यात आले तसेच हलाल मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Halal Protest

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.