जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला आता राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून मराठीजनांच्या ह्रदयावर राज्य करणा-या या महाराष्ट्र गौरव गीताने खास जागा घेतली आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची घोषणा केली आहे.
“दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा” अशी भावना
या घोषणेची माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले, गर्जा महाराष्ट्र माझा हे उत्साह वाढवणारे गीत असून, या गीताच्या शब्दांमध्ये एक ऊर्जा आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अशी भावनाही यामध्ये आहे. हे गीत मोठे असून साडेतीन मीनिटे चालते पण यातील दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार आम्ही केला आहे. मात्र, या गीतातील राज्यगीत म्हणून निवडलेली दोन कडवी कुठली असतील आणि त्याची अंमलबजावणी कधी आणि कशी केली जाईल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
( हेही वाचा: येरवडा मध्यवर्ती कारागृहाचा जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक )
Join Our WhatsApp Community