मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या बांग्लादेशी रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश बुधवारी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पी नॅार्थ प्रशासनाला दिले.बांग्लादेशी – रोहिंग्या घुसखोरांची संपूर्ण माहिती घेऊन ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मालाड परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांमुळे भुमिपुत्रांच्या हक्कांचे नुकसान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबईतील भूमिपुत्रांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा: Travel Now Pay Later : रेल्वे प्रवाशांना मिळणार उधारीवर तिकीट; आधी प्रवास करा, मग तिकिटाचे पैसे भरा! )
बांग्लादेशी घुसखोरांना शोधण्यासाठीच्या समितीत महापालिका उपायुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, सहा.पोलीस उपायुक्त व रेशनिंग अधिकारी यांचा समावेश असेल. दरम्यान, हा माजी मंत्री अस्लम शेख यांचा मतदारसंघ असून, पालिका निवडणुकीआधी भाजपाने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
Join Our WhatsApp Community