वसईचा पर्यटनच्या माध्यमातून विकास करण्यासाठी केंद्र सरकार अधिक लक्ष घालणार आहे. तसेच वसईत असलेल्या पाणजू या बेटाच्या पर्यटन विकासासाठी ८०० कोटी रुपये देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.” अशी घोषणा केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी केली आहे. भाजप व प्रतीक्षा फांऊडेशनकडून वसईत ‘दीपावली व ओणम महोत्सव २०२२’ यावर्षी मोठ्या जल्लोषात पार पडला, यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, तसेच केंद्रीय खादी ग्राम उद्योगच्या अध्यक्ष डॉ. हिना शाफि भट, राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडीत (कॅबिनेट मंत्री (दर्जा), धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे भाजप वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक, माजी आमदार हेमेंद्र मेहता, भाजप वरिष्ठ नेते श्याम पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनियुक्ती राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडीत (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांचा श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘प्रतीक्षा पुरस्कार २०२२’ देऊन, सामाजिक कार्यकर्ते हरेश्वर नाईक, अभिनेत्री निशा परुळेकर, चित्रकार सुभाष गोंधळे, जागतिक महिला बॉडीबिल्डर स्नेहा पाटील, डॉ. राहुल भांडारकर, शिल्पकार सिक्वेरा बंधू आदींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंधू नायर यांनी केले. आभार प्रदर्शन महेश सरवणकर यांनी केले.
( हेही वाचा: Travel Now Pay Later : रेल्वे प्रवाशांना मिळणार उधारीवर तिकीट; आधी प्रवास करा, मग तिकिटाचे पैसे भरा! )
हिना भट यांनी यावेळी बोलताना, मी. मागील ९ वर्षांपासून वसईत येत आहे. जम्मू-काश्मिरमध्ये मी पहिली महिला आहे, जिने भाजपमध्ये प्रवेश केला. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मिरमध्ये पर्यटकांची संख्या दीड कोटींच्या घरात आहे. एक देश एक ध्वज ही पंतप्रधानांची व संबंध देशवासियांची इच्छा आज पूर्ण झाली आहे, ही बाब आपणासाठी गर्वाची आहे, असे त्या म्हणाल्या.
योजना वसईकरांपर्यंत पोहोचू दिल्या जात नाही
आयुष्यमान भारत योजना वसईच्या एकही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही; किंबहुना पोहचू दिली नाही आज-उद्या केंद्राकडून पैसे येतीलही. परंतु त्यामध्ये कशाप्रकारे बिल्डराचे भले करता येईल, याची नवी शक्कल लढवली जाईल, त्याबाबतीत लक्ष देण्याचे आदेश आपण आपल्या विभागाला द्यावे, अशी विनंती भाजप वसई-विरारचे जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी मंत्री महोदयांना केली.
Join Our WhatsApp Community