2016 पासून प्रतीक्षेत असणाऱ्या वंदे भारत या हाय स्पीड ट्रेनला रेल्वे बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे आता सोलापूरकरांना मुंबई अवघ्या सात तासात गाठणे शक्य होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेले अनेक वर्षे याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहेत. याशिवाय सोलापूरचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर स्वामी यांनी देखील नव्या वर्षात जानेवारीपासून ही रेल्वे सुरू करण्याचा आग्रह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे धरला आहे.
( हेही वाचा : नवाब मलिकांना दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ)
संपूर्ण अनुकूलित गाडी आणि किमान ११० ते कमाल २०० ताशी वेगाने धावणारी ही रेल्वे आपल्याला विभागाला मिळावी असा पाठपुरावा खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आणि खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी केला होता, त्याला मंगळवारी रेल्वे बोर्डाच्या बैठकीत यश आले. सध्या महाराष्ट्रात मुंबई अहमदाबाद अशी एक हायस्पीड ट्रेन सुरू आहे मात्र ती रेल्वे अहमदाबाद विभागाची आहे. पण मुंबई ते सोलापूर असा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात धावणारी पहिली रेल्वे आहे. आता ही रेल्वे कोणत्या विभागाची असेल हा प्रश्न आहे. मात्र याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात असल्याचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community