भारत विरूद्ध न्यूझीलंड हा सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सराव सामना रद्द झाल्याने वर्ल्ड कपवर परिणाम होत नाही परंतु जर प्रत्यक्ष वर्ल्ड कप सुरू असताना अशाप्रकारे पावसाने हजेरी लावली तर नेमके काय करणार याबाबत आता क्रिकेटप्रेमींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. याचे नियम ICC ने स्पष्ट केले आहेत.
( हेही वाचा : नव्या वर्षात सोलापूर-मुंबई वंदे भारत धावणार, प्रवास होणार जलद )
विश्वचषक स्पर्धेदरम्यान सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे स्पर्धेदरम्यान जर पाऊस पडला तर काय करायचे याबाबत ICC ने नियम जारी केले आहेत.
विश्वचषकादरम्यान पाऊस पडला तर काय करणार?
- सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पडला आणि पाच षटकेही टाकण्याची परिस्थिती नसेल तर राखीव दिवस वापरला जाणार आहे.
- सामना वेळेवर सुरू झाला आणि मध्येच पाऊस पडू लागला आणि पुन्हा सामना सुरूच होऊ शकला नाही तर राखीव दिवशी सामना जिथे थांबवला जाईल तिथून पुढे सुरूवात होईल.
- फक्त प्ले ऑफच्या सामन्यांसाठीच हे राखीव दिवस असतील. जर साखळी फेरीतील सामन्यांमध्ये पाऊस पडला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे साखळी स्पर्धेतील एका सामन्यातील विजयाला २ गुण मिळतील तर पराभवाला शून्य गुण मिळतील. सामना टाय झाला, रद्द झाला किंवा सामन्याचा निकाल लागला नाही, तर दोन्ही संघांमध्ये १ गुण विभागला जाईल, पात्रता आणि सुपर १२ फेरीसाठी कोणताही दिवस राखीव नसेल म्हणजे सामना रद्द झाल्यास पुन्हा खेळवता येणार नाही. त्यामुळे पावसामुळे साखळी फेरीत पावसामुळे एखाद्या संघाला फटका बसू शकतो.