मुंबईतील ‘या’ तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार; पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर धमकीचा फोन

192

दिवाळीला काही दिवसच बाकी असताना मुंबईला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर आला. या धमकीच्या कॉलमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी धमकी देण्यात आलेल्या तिन्ही ठिकाणी तपासणी केलेली आहे. यादरम्यान पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलेले नाही.

( हेही वाचा : शिवसेनेच्या टीकाकारांनाच बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीत स्थान)

मुंबईतील पश्चिम उपनगरातील जुहू येथील पीव्हीआर सिनेमा, पार्ल्यातील सहारा हॉटेल आणि अंधेरीतील इन्फिनिटी मॉल बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचा धमकीचा कॉल मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर आला होता. कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कॉलची दखल घेऊन तात्काळ ज्या ठिकाणांची नावे देण्यात आली तेथील संबंधित पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले. तसेच बॉम्ब निकामी आणि शोधक पथकाला सदर ठिकाणी पाचारण करून तिन्ही ठिकाणी तपास करण्यात आला आहे. परंतु पोलिसांना कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. ऐन सणासुदीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, त्याच बरोबर नाकाबंदी, हॉटेल तपासणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कॉल करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.