मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या

192

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. भायखळा येथे ते राहत होते. त्याच इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचे रिडेव्हलपमेंट करणारे प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी गुरुवारी आत्महत्या केली आहे. भायखळा येथील राहत्या इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली.

( हेही वाचा: PFI च्या पदाधिका-यांसह तिघांना पनवेल येथून अटक )

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचे रिडेव्हलपमेंट करणारे प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली. त्यांनी भायखळा येथील राहत्या इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पारस पोरवाल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पारस पोरवाल यांना जखमी अवस्थेत केईएम रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. काळाचौकी पोलिसांनी पारस यांनी ज्या ठिकाणाहून उडी घेतली त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पोलिसांना पोरवाल यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहलेली सुसाईड नोट सापडली. त्यात त्यांनी माझ्या मृत्यूला कोणीही जवाबदार नसून कुठलीही चौकशी करू नये, असे लिहले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारस पोरवाल यांचे मुंबईत अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहे. परंतु त्यांना त्यांच्या व्यवसायात सतत नुकसान होत होते, कोरोना काळापासून ते आर्थिक संकटातदेखील सापडले होते. तेव्हापासून ते मानसिक तणावात होते, अशी माहिती पोलिसांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली. आर्थिक संकटात असल्यामुळे पारस पोरवाल यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.