राज्यातील महिलांवर तणाव वाढतोय; 1 कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीचे निष्कर्ष

129

राज्यातील महिलांना ताणतणाव असह्य होत असून, उच्च रक्तदाबाचाही त्रास वाढू लागल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाअंतर्गत राज्यात आतापर्यंत एक कोटींवर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यात आजारासंदर्भात सावध करणारी माहिती पुढे आली आहे.

तपासण्या

  • वजन व उंची घेऊन बीएमआय काढणे
  • रक्त,लघवी शर्करा तपासणी
  • एचएलएलमार्फत व संस्थास्तरावर उपलब्ध सर्व रक्त तपासण्या
  • छातीचा एक्स रे आवश्यकतेनुसर मॅमोग्राफी
  • कर्करोग, रक्तदाब व मधुमेह स्क्रीनिंग
  • आरटीओ- एसटीआय तपासणी
  • माता व बालकांचे लसीकरण
  • व्यवसनमुक्ती

( हेही वाचा: हिमनदी वितळली तर कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार; अभ्यासातून खुलासा )

तपासणीतील आकडेवारी

  • 1 करोड 5 लाख 30 हजार 118 – अभियानाअंतर्गत महिलांची तपासणी
  • 1 लाख 56 हजार 504  – उच्च रक्तदाबाचे प्राथमिक निदान
  • 94 हजार 243 – 30 वर्षांवरील महिलांना मधुमेह
  • 26 लाख 76 हजार 702 – मानसिक आरोग्य, तंबाखूबाबत समुपदेशन
  • 20 लाख 505 – कर्करोगसदृश निदान
  • 12 हजार 35- ह्रदयासंबंधी आजाराचे निदान
  • 45 हजार 342- शस्त्रक्रिया करण्यासाठी संदर्भित महिला
  • 7 हजार 122 -गर्भाशय मुख कर्करोगाचे प्राथमिक निदान

राज्यातील दुर्गम- अतिदुर्गम आदिवासी पाडे, तांडा वस्तीसह ग्रामपंचायतीपासून ते थेट महानगरातील माता- भगिनी आरोग्याची तपासणी करुन घेत आहेत. 20 दिवसांत एक कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीचा टप्पा गाठला आहे. उपचार व शस्त्रक्रियेबाबतही नियोजन करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.