ठाणेकरांनो! दिवाळीच्या निमित्ताने शहरात असा होणार वाहतुकीत बदल

141

ठाणेनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत दिपावली सणाच्या निमित्ताने दि. 26 ऑक्टोबर रोजी पर्यंत दररोज 14.00 ते 23.00 वाजे पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.

(हेही वाचा – ‘मविआ’च्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतरही ‘एमआयडीसी’कडून भूखंड वाटप; ‘ते’ अधिकारी रडारवर)

वाहतूकीतील बदल पुढील प्रमाणे

  1. प्रवेश बंद : जांभळी नाक्याकडून बाजारपेठेत जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना जांभळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
  • पर्यायी मार्ग : सदरची वाहने ही कोर्टनाकायेथून जांभळीनाका येथे उजवीकडे वळण घेवून टॉवर नाका मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.

2. प्रवेश बंद : खारकर आळीकडून बाजारपेठ जांभळी नाका कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना महाजनवाडी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

  • पर्यायी मार्ग : सदरची वाहने ही खारकर आळीकडून येऊन ठामपा व्यायाम शाळा येथुन महाजन वाडी हॉल लगत उजवीकडे वळुन एन.के.टी. कॉलेज मार्गे कोर्ट नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

3. प्रवेश बंद : ठाणे ट्रेडर्स दुकानाकडून महंमद अली रोडने जांभळी नाका बाजुकडे येणाऱ्या मोटार सायकल वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

  • पर्यायी मार्ग : सदरची वाहने ठाणे ट्रेडर्स दुकानाकडून उजवीकडे वळुन महागिरी मशीदकडे वळुन इच्छीत स्थळी जातील.

4. प्रवेश बंद : दादोजी कोंडदेव स्टेडीयमकडून बाजारपेठ कडे जाणा-या सर्वप्रकारच्या वाहनांना स्टेडीयमजवळ प्रवेशबंद करण्यात येत आहे.

  • पर्यायी मार्ग : सदरची वाहने अग्नीशमन कार्यालय येथून राघोबा शंकर रोड मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.

5. प्रवेश बंद : अशोक सिनेमा नॅशनल इलेक्ट्रॉनिक दुकानाकडून बाजारपेठेत जाणाऱ्या मोटार सायकल वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना अँटीट्यूड दुकानाजवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे.

  • पर्यायी मार्ग : सदाची वाहने ही नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स दुकान येथून उजवीकडे वळून दत्त मंदिर सिडको स्टॅण्डकडून इच्छित स्थळी जातील.

पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा बदल लागू राहणार नाही, असे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.