ठाण्यातील दूध विकेत्यांनी एकदिवसीय लाक्षणिक बंदची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री १२ वाजेपासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत दूध विक्री बंद राहणार असल्याचे दूध विक्रेता संघाने जाहीर केले आहे. दरवर्षी दुधाच्या किंमतीत वाढ होत आहे. मात्र दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, त्यामुळे एक दिवस दूध विक्रेत्यांनी लाक्षणिक बंदची घोषणा केली आहे.
(हेही वाचा – ‘मविआ’च्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतरही ‘एमआयडीसी’कडून भूखंड वाटप; ‘ते’ अधिकारी रडारवर)
काय आहे कारण
२०१५ पासून आतापर्यंत एका लीटरमागे २० रूपयांनी दूधाचे दर वाढले आहेत. पण दूध विक्रेत्यांना त्यांच्या कमिशनमध्ये १० पैसे देखील वाढवून दिले गेले नाहीत. त्यामुळे एक दिवस लाक्षणिक बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे दहा लाख लीटर विकले जाणार नसल्याने ऐन दिवाळीच्या ही दूध विक्री बंद राहणार असल्याचा त्यांचा फटका नागरिकांना बसणार आहे. दरम्यान, एका लीटर मागे १० टक्के कमिशन देण्याची मागणी दूध विक्रेता संघाने केली आहे.
ठाण्यात दर दिवसाला दहा लाख लीटर दूधाची विक्री होते. ठाणेकरांच्या दूधाची मागणी ही विविध दूध कंपन्या पूर्ण करतात. ठाण्यात कमीतकमी सातशे दूध विक्रेते आहे. दूध उत्पादन कंपन्या वर्षाला दूध दराच्या किंमतीत वाढ करतात. मात्र उत्पादन करणाऱ्या कंपन्या घरोघरी दूध पोहोचवणाऱ्या विक्रेत्यांचा विचार करत नाही. दूध विक्रेत्यांना फक्त दोन टक्के कमिशन मिळते. गेल्या पाच वर्षात विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये १० पैसे देखील वाढ न झाल्याने विक्रेत्यांनी बंदची घोषणा केली आहे.
Join Our WhatsApp Community