नेमबाजीत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला २ कोटी रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

131

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याला रोख २ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली.

( हेही वाचा : दिवाळीत अनलिमिटेड मनोरंजन; फक्त ५९ रुपयांमध्ये मिळवा १५हून अधिक OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन)

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला.

कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्याबद्द्ल मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रुद्रांक्ष पाटीलने केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

२०२४ ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्रांक्ष पाटील याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.