भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा समोर आले आहेत. अनेकदा भारताच्या बाजूने उभे राहून रशियाने आपले मित्रत्व सिद्ध केले आहे. आताही एक नकाशा जारी करत रशियाने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना चांगलाच दणका दिला आहे.
चीन आणि पाकिस्तानला धक्का
स्पुतनिक या रशियन न्यूज एजन्सीने एक नकाशा जारी करत या नकाशात भारत आणि चीनदरम्यान वादग्रस्त असलेला अक्साई चीनसह अरुणाचल प्रदेश आणि पाकव्याप्त काश्मीर(POK) हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे भारतविरोधी कारवाई करणा-या पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजारी राष्ट्रांना चांगलाच धक्का बसला आहे.
(हेही वाचाः )
भारताची बाजू भक्कम
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन(SCO)च्या सदस्य राष्ट्रांचा हा नकाशा रशियन सरकारकडून जारी करण्यात आला आहे. या नकाशात भारताच्या भूभागांवर चीन आणि पाकिस्तानकडून होणा-या अतिक्रमणाला धक्का बसला असून जागतिक पातळीवर भारताचे स्थान अधिक बळकट झाले आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र चीनने SCO साठी जारी केलेल्या आपल्या नकाशात मात्र भारतातील भागांवर आपला हक्क सांगितला आहे. पण रशियाच्या या नकाशामुळे चीनला देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
Join Our WhatsApp Community