राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.
( हेही वाचा : ठाण्यातील ‘या’ खारफुटींवर मैदान बनवण्यासाठी दिवसाढवळ्या डेब्रिजचा भराव)
राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला उपरोक्त निर्देश दिले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
Join Our WhatsApp Community