राणे पिता-पुत्रांविषयी टीका करणं शिवसेनेच्या भास्कर जाधवांना भोवलं, पुण्यात गुन्हा दाखल

शिवसेना आमदार भास्कर जाधवांवर पुण्यात गुन्हा दाखल

123

शिवसेना पक्षाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधवांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या दृष्टीने नुकतेच वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या भाषणात केले होते. याप्रकरणी भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली असून पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात योगेश अरुण शिंगटे (रा.निगडी,पुणे) यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

(हेही वाचा – ‘मविआ’च्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतरही ‘एमआयडीसी’कडून भूखंड वाटप; ‘ते’ अधिकारी रडारवर)

याप्रकरणी योगेश अरुण शिंगटे यांनी डेक्कन ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंगटे हे राणे यांचे खासगी स्विय सहायक आहेत. बुधवारी दुपारी ते डेक्कन परिसरातील गुडलक हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी ते त्यांचे फेसबुक पहात होते. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, सिंधुदुर्ग, कुडाळ याठिकाणी कुडाळ मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सुरू असलेल्या चाैकशीचा निषेध करण्यासाठी एक माेर्चा आयाेजित केला हाेता. त्यावेळी या मोर्चामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिनकरण्याच्या हेतूने अर्वाच्छ भोषत वक्तव्य केले.

या वादग्रस्त वक्तव्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असून राजकीय पक्षातील कार्यकर्त्यात सामाजिक, भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यात संघर्ष निर्माण हाेण्यास चिथवाणी दिली. केंद्रीय मंत्री पद हे संविधानिक पद असून या पदाचा अपमान करुन जनमानसात बदनामी करुन सार्वजनिक आगळीक केल्याप्रकरणी शिंगटे यांनी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.