महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत २०० कोटींनी तात्पुरती वाढ करण्यास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
( हेही वाचा : मुंबईत ३ ठिकाणी बॉम्बस्फोट हल्ल्याची धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल)
आकस्मिकता निधीची मर्यादा १५० कोटी रुपये इतकी असून २०० कोटींची तात्पुरती वाढ झाल्याने ती ३५० कोटी रुपये होईल. यासाठीचा अध्यादेश निर्गमित करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीला बळ
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भागभांडवल ३११ कोटी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
२१ सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी (MAHA ARC Limited) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्याप्रमाणे कंपनी निबंधकाकडे नोंदणी झाली असून या कंपनीचे भागभांडवल १११ कोटींवरुन आज ३११ कोटी असे वाढविण्यात आले.
Join Our WhatsApp Community