भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अद्याप कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ अनिल देशमुख यांची दिवाळी देखील तुरूंगातच जाणार आहे.
(हेही वाचा- संजय राऊतांची दिवाळीसुद्धा तुरुंगातच जाणार, 2 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी)
दरम्यान, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुख यांना जामीन मिळाला होता. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुखांना जामीन मिळाला होता. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यावरून सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याने या प्रकरणातगी जामीन मिळावा अशी याचिका देशमुखांच्या वतीने करण्यात आली होती. यावर सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. आज, शुक्रवारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुखांची यंदाची दिवाळी तुरूंगात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाने अनिल देशमुखांना मोठा झटका बसल्याचे सांगितले जात आहे. देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, 73 वर्षीय अनिल देशमुख हे सध्या अतिताण, हृदयविकार यांसारख्या विविध गंभीर आजारांनी त्रस्त असून त्यांच्यावर जसलोक रुग्णलयात उपचार सुरू आहेत.