मुंबई महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक आणि बेस्ट बस कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस राज्य सरकारने जाहीर केला होताय. या निर्णयामुळे बेस्टच्या २९ हजार कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे. भाजप बेस्ट कामगार संघाच्या शिष्टमंडळाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी कुलाबा येथे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांची भेट घेतली होती. यावेळी दिवाळी बोनस दिनांक २१ रोजी शुक्रवारी कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला आहे. तसेच बोनस वेळेत मिळाल्यामुळे बेस्ट कामगारांनी सरकारचे आभार मानले आहेत.
(हेही वाचा : माथेरान मिनी ट्रेन ‘या’ तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत; पहा संपूर्ण वेळापत्रक )
बेस्टला मुंबईकरांची पसंती
दरम्यान, बेस्ट उपक्रमाने गेल्या काही महिन्यांमध्ये १ रुपयात प्रवास, दिवाळी ऑफर, नवरात्री विशेष प्रवासी योजना प्रवाशांना उपलब्ध करून दिल्यामुळे सध्या बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या जवळपास ३० लाख इतकी झाली आहे. बेस्टच्या सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या प्रवाशांची सरासरी ३२ लाखांपर्यंत गेली आहे.
महिना – प्रवासी संख्या – महसूल
- मे – २४ लाख ९३ हजार – १ कोटी ८८ लाख
- जून – २८ लाख १६ हजार – २ कोटी ९ लाख
- जुलै – २८ लाख १३ हजार – २ कोटी ७ लाख
- ऑगस्ट – २९ लाख १८ हजार – २ कोटी ७ लाख
- सप्टेंबर – २९ लाख ८५ हजार – २ कोटी १४ लाख