आता रितेश देशमुखच्या मागे चौकशीचा ससेमिरा

162
बॉलिवूडचा कलाकार रितेश देशमुख याच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या मालकीच्या कंपनीला लातूरमध्ये देण्यात आलेल्या भूखंडाची चौकशी सुरु असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी डावलण्यात आली

एमआयडीसीचे सीईओ बीपीन शर्मा या प्रकरणाची चौकशी करत असल्याची त्यांनी माहिती दिली. लातूर एमआयडीसीमध्ये रितेश आणि जिनिलिया यांच्या देश अॅग्रो प्रा. लि. कंपनीला महिन्याभराच्या आतच 120 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना डावलण्यात आले आणि रितेश-जिनिलियाच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड कंपनीला भूखंड देण्यात आला. हा भूखंड केवळ एका महिन्यात त्यांना देण्यात आला. तसेच या कंपनीला एकाच महिन्यात 120 कोटींचे कर्जही मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.