मुंबईत एकाच दिवशी दोघांचे अवयवदान

165

वर्सोवा येथे रस्ते अपघातात बुधवारी १८ ऑक्टोबरला २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला त्यानंतर या तरुणाला तातडीने धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल केले गेले. दुस-या दिवशी या तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी तरुणाच्या आईला अवयवदानाविषयी माहिती दिली. या समाजकार्यातून गरजू रुग्णांना नवे अवयव मिळून त्यांच्या जीवनाला नवी संजीवनी मिळेल, अशी माहिती दिली. महिलेने या समाजकार्यासाठी होकार दिला. या तरुणाचे यकृत, मूत्रपिंडे तसेच डोळे आणि हृदयाचे दान केल्याने पाच जणांना नवे आयुष्य मिळाले. तसेच वसईतील ७३ वर्षीय प्रभाकर तेंडुलकर यांचा अवयवदानाचा संकल्प त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मुलाने पूर्ण केला. या दोन अवयवदानाच्या घटनांनी मुंबईतील अवयवदानाचा आकडा ३३ पर्यंत पोहोचला आहे.

( हेही वाचा : बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर; ऐन दिवाळीत प्रवाशांची होणार गैरसोय )

नालासोपारा येथील ७३ वर्षीय प्रभाकर तेंडुलकर यांना ब्रेन हेमरेजचा त्रास झाला होता. शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने डॉक्टरांनी रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याची पूर्वकल्पना कौस्तुभ तेंडुलकर यांना दिली. कौस्तुभ तेंडुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील प्रभाकर तेंडुलकर यांना समाजकार्यात सहभागी व्हायचे होते परंतु त्यांना पोलिओ होता. अवयवदानाची चळवळ फारशी प्रचलित नसताना प्रभाकर तेंडुलकर अवयवदानाविषयी आग्रही असायचे. त्या काळी मरणोत्तर अवयवदान करा, अशा आशयाचे कोणत्याही संस्थेकडून अवयवदाता ओळखपत्र दिले जात नव्हते. आपल्याला आकस्मिक मरण आल्यास शेवटची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रभाकर तेंडुलकर खिशात अवयवदानाविषयी माहिती देणारी चिठ्ठी कायम बाळगायचे, असे कौस्तुभ तेंडुलकर यांनी सांगितले. आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन कौस्तुभ यांनीही मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.