बॅंकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एकूण १ हजार ४२२ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाटी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रात २०० पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२२ आहे. एकूण १ हजार ४२२ पदांपैकी आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांसाठी सर्वाधिक ३०० रिक्त आहेत. तर महाराष्ट्र आणि गोवामध्ये २१२, राजस्थानमध्ये २०१, तेलंगणामध्ये १७६ आणि ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये १७५ जागा रिक्त आहेत.
( हेही वाचा : राज्य सरकारच्या आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती होणार, असे आहे वेळापत्रक)
अटी व नियम जाणून घ्या
- पदाचे नाव – अधिकारी (CBO)
- पदसंख्या – १ हजार ४२२ जागा
- वयोमर्यादा – २१ ते ३० वर्ष
- अर्ज शुल्क – General/EWS/OBC – ७५० रुपये
SC/ST/PWD – कोणतेही शुल्क नाही - अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १८ ऑक्टोबर २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०२२
अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांनी सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे आणि नंतर दिलेल्या नोंदमी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक
SBI भरती : https://sbi.co.in/
Join Our WhatsApp Community