नागरिकांवरील विविध करांतून सरकारला उत्पन्न मिळाले. मात्र, आता न्यूझीलंड सरकारने गायींच्या ढेकर देण्यावरही कर आकारला आहे. सरकारने असा निर्णय का घेतला आहे ते जाणून घेऊ.
सरकारचे मत काय?
गाई, मेंढ्या आणि शेळ्यांच्या ढेकरामुळे बाहेर पडणारे वायू पर्यावरणाला हानी पोहचवतात, असे पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांच्या सरकारचे मत आहे. त्यामुळेच हा कर लावला जात आहे.
गायींच्या ढेकरावर कर लावण्याच्या निषेधार्थ न्यूझीलंडमधील शेतकरी हजारो ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. न्यूझीलंड हा कृषी कर आकारणारा जगातील पहिला देश बनणार आहे. करातून मिळणारा पैसा शेतक-यांशी संबंधित संशोधनासाठी वापरला जाईल.
( हेही वाचा: Halal Product: हलाल मांस झटक्यापेक्षा वेगळे कसे? ते जाणून घ्या )
दुग्धजन्य उत्पादनात न्यूझीलंड कुठे?
- न्यूझीलंड हा जगातील सर्वात जास्त दुग्धजन्य पदार्थ निर्यात करणारा देश आहे.
- देशाच्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनात या क्षेत्राचा निम्मा वाटा आहे , हेही वास्तव आहे.
- पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डर्न म्हणाल्या की, 2030 पर्यंत, आम्ही मिथेन उत्सर्जन 10 टक्के पर्यंत कमी करणार.
- 2025 ला ढेकरावर कर लागू करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.
नेमके काय होतेय?
गाय किंवा म्हशीच्या ढेकरातून मिथेन आणि लघवीतून नायट्रोजन ऑक्साईड सोडले जाते आणि त्यामुळे नुकसान होते, असे समोर आले आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या सुमारे 50 लाख आहे आणि येथे 1 कोटींपेक्षा अधिक गायी आणि म्हशी आहेत. याशिवाय सुमारे अडीच कोटी मेंढ्या आहेत. देशाच्या एकूण हरितगृह उत्सर्जनात या प्राण्यांचा वाटा निम्मा आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन होत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community