एसटी महामंडळाला कोरोना काळात आणि त्यानंतर संपामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता मागील काही महिन्यांपासून एसटी सेवा सुरळीतपणे सुरू आहे. महामंडळात नवीन एसटी बस एवढे वर्ष दाखल झाल्या नव्हत्या. जुन्या बसेसची अवस्था अतिशय वाईट झाली होती. त्यामुळे आता एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात ७०० नवीन बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : सर्व सरकारी बॅंकांसाठी एकच हेल्पलाईन क्रमांक; ग्राहकांच्या समस्यांचे होणार निवारण)
नव्या एसटी बसचे फिचर
- टू बाय टू आसन व्यवस्था
- बारा मीटर लांबीच्या बस
- प्रशस्त आसन व्यवस्था
- लग्जरी बससारखी व्यवस्था
भविष्यात नव्या बसेसची संख्या वाढवणार
भविष्यात या नव्या बसेसची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. नव्या बस जरी एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्या तरी या बसेसचे दर मात्र वाढवण्यात आलेले नाहीत. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर लक्षात घेऊन महामंडळ इलेक्ट्रिक बस ताफ्यात आणण्याच्या तयारीत आहे. तसेच एसटी महामंडळाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढणे हा मुख्य हेतू आहे अशी माहिती शेखर चन्ने यांनी दिली आहे. या नव्या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होऊन आरामदायी होणार आहे.
Join Our WhatsApp Community