अलिकडे सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे ऑनलाईन अॅप डाऊनलोड करताना, कोणत्याही लिंकवर क्लिक करताना दक्षता बाळगणे आवश्यक असते. यासंदर्भात गुगलने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गुगलने पुन्हा एकदा १२ अॅप्स प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. तर अन्य ४ अॅप्सबाबत सिक्योरिटी एजन्सीला माहिती मिळाली नाही. हे अॅप्स युजरची वैयक्तिक माहिती, स्मार्टफोनची बॅटरी क्षमता कमी करत होते असे गुगलने स्पष्ट केले आहे. सिक्योरिटी एजन्सीच्या रिपोर्टनंतर गुगलने या अॅप्सला प्ले स्टोअरवरून हटवले आहे. हे अॅप्स लोकांच्या मोबाईलमधून डेटा चोरी करत होते तसेच या अॅप्सला २० मिलियनहून जास्तवेळा डाऊनलोड करण्यात आले होते. या अॅप्सच्या लिस्टमध्ये क्यूआर कोड, स्कॅनर, टॉर्च अशाप्रकारच्या अॅप्सचा समावेश आहे.
( हेही वाचा : फक्त माझ्याची मुलांची भाषा का खटकते? भास्कर जाधवांची भाषा आवडते का? नारायण राणेंचा पलटवार )
गुगलने काढून टाकलेल्या अॅप्सची संपूर्ण यादी…
- BusanBus
- Joycode
- Currency Converter
- High-Speed Camera
- Smart task Manager
- Flashlight+
- K-Disctionary
- Quick Note
- EzDica
- Instagram Profile
- Downloader
- Ez Notes
- ( अन्य ४ अॅप्सबाबत सिक्योरिटी एजन्सी तपास करत आहेत.)
या अॅपमुळे युजरचा डेटा चोरी केला जात आहे. त्यामुळे गुगलने ही कारवाई करत प्ले स्टोअरवरून असे अॅप्स हटवले आहेत.
Join Our WhatsApp Community