दीपावलीच्या सणांत दिवाळी पहाटच्या निमित्ताने गायनांच्या मैफिलींचे आयोजन करत या दीपावलीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला जात असून शनिवारपासून ते बुधवारपर्यंत विविध ठिकाणी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले. या विविध ठिकाणी आयोजित दिवाळी पहाटमध्ये अनेकांच्या सुमधुर गीतांचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये भाजपसह विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी मुलुंडमध्ये दिवाळी पहाट पहिला कार्यक्रम संपन्न
शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर २०२२ रोजी मुलुंड सेवा संघाच्यावतीने सकाळी सात वाजता मुलुंड कालिदास नाट्यमंदिरात सप्तसुरांची संगीत आणि प्रकाशमय दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी पहाटमध्ये श्रीरंग भावे, शमिका भिडे, दत्ता मेस्त्री, अमृता दहिवेलकर आदी गायक आपली गाणी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले, तर या कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक यांनी केले होते.
रविवारी दिवाळी प्रभातचे दर्शन
दीपावलीनिमित्त रविवारी दिवाळी प्रभात दर्शनचे आयोजन करण्यात आले असून या दिवाळी पहाटमध्ये मराठी चित्रपट सृष्टीचा लखलखता इतिहास जागवला जागवला जाणार आहे. या पहाटच्या कार्यक्रमामध्ये सोमेश नार्वेकर,केतन पटवर्धन, मयुर सुकाळे, शाल्मली सुखटणकर, सायली महाडिक, दिप्ती आंबेकर आणि वर्षा भावे यांच्यासह कलांगणचे ७५ यशवंत गुणवंत हे आपली गाणी सादर करणार आहेत. रविवारी दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे साडेसहा वाजता दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात या प्रभात दर्शनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, संशोधन, लेखन आणि सुसंवाद ही वर्षा भावे यांची आहे .
सोमवारी दादरमध्ये स्वरमय दिपावलीचे आयोजन
भाजपचे विक्रांत आचरेकर आयोजित स्वरमय दीपावली आयोजन येत्या सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आले आहे. या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये मंदार आपटे, राधिका नांदे, डॉ जय आजगावकर, सायली जोशी राजवाडे, मयुरेश साने आदी गायकांच्या गाण्यांचा आनंद लुटता येणार आहे. दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आयोजक विक्रांत आचरेकर यांनी दिली आहे.
अंधेरीच्या राजा मैदानावर सोमवारी दिवाळी पहाटचे आयोजन
शिवसेना वर्सोवा विधानसभा व आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे या वर्षी सोमवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अंधेरीचा राजा मैदान,आझाद नगर क्र.२ , वीरा देसाई रोड अंधेरी पूर्व येथे होणार आहे. २००३ पासून हा दिवाळी पहाट कार्यक्रम शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक प्रदीप कडू, गायिका माधुरी नारकर.पार्श्वगायक गौरव दांडेकर तसेच पार्श्वगायिका ब्रम्हानंदा पाटणकर अशी नावाजलेली गायन क्षेत्रातील गायक व गायिका या दिवाळी पहाट कार्यक्रमात भाग घेणार आहेत. या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण चित्रपट निर्मात्या व जेष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी या असणार आहेत, तर मराठी अभिनेते पराग चौधरी या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
बोरीवलीमध्ये सोमवारी दिवाळी पहाटचे आयोजन
अनुबोध व नवचैतन्य प्रतिष्ठानच्यावतीने स्वर लता या दिवाळी पहाटचे आयोजन सोमवारी २४ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे साडेसहा वाजता बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात करण्यात आले आहे. या दिवाळी पहाटमध्ये माधुरी करमरकर, सुस्मिता डवाळकर, शाल्मली सुखटणकर आणि श्रध्दा वैद्य यांच्या गायनाच्या आनंद लुटता येणार आहे. सर्वांच्या लाडक्या दिदी अर्थात लता मंगेशकर यांच्या गोड गळ्याचा परिस्पर्श झालेल्या गीतांचा सुरेल स्वरसोहळ्याचे आयोजन भुषण पाटील, सुबोध खेर, अनूप चलकरण, मनोज नायर आणि अनिल परब यांनी केले आहे.
मंगळवारी विलेपार्लेत ‘जब दीप जले आना’ दिवाळी पहाट
अटल सेवा केंद्र तर्फे सलग ७ व्या वर्षी मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता, पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानावर ‘जब दीप जले आना’ दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सावनी रवींद्र, सुर नवा ध्यास नवा फेम शरयू दाते, गौरव महाराष्ट्राचा विजेता नचिकेत देसाई यांची स्वर आतिषबाजी असेलच, शिवाय सध्या सर्वत्र गाजत असणाऱ्या ‘ किशोर कुमार ‘ फेम अलोक काटदरे यांचाही विशेष स्वरसहभाग असणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुरेल मराठी व हिंदी गीतांचा स्वरानंद प्राप्त होणार आहे, याशिवाय ‘ पारंपरिक वेशभूषा स्पर्धा ‘ आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमस्थळी म्हणजेच पार्ले टिळक विद्यालय (इंग्रजी माध्यम) शाळेच्या मैदानावर उपस्थित रहावे, पुरुष व महिला गटात वेगवेगळी पारितोषके देण्यात असे या कार्यक्रमाचे आयोजक अटल सेवा केंद्राचे संचालक माजी नगरसेवक अभिजित सामंत आणि संचालिका अंजली अभिजित सामंत
बुधवारी भडीपा आयोजित दिवाळी पहाट
भडीपा आयोजित दिवाळी पहाट येत्या बुधवारी दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. दिवाळी पहाटचा कार्यक्रम दादर पश्चिम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणार आहे.
(हेही वाचा हिंदूंच्या धर्मांतरासाठी ॲमेझॉन पुरवते पैसा? राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची नोटीस)
Join Our WhatsApp Community