हलाल विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम, डोंबिवलीत कोकण महोत्सवातून हलाल स्टॉल फलक हटवला 

250

मागील काही वर्षांपासून भारतात हलालच्या माध्यमातून समांतर इस्लामी अर्थव्यवस्था उभी करण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्याविरोधात आता हिंदुत्ववादी संघटना संघटित होऊ लागल्या आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे नुकतेच झालेल्या हलाल सक्ती विरोधी परिषदेत हलाल सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर देशभरातून हलाल विरोधात आंदोलने सुरु झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून डोंबिवली येथे कोकण महोत्सवात हलाल चायनीज नावाचा स्टॉल लावण्यात आल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले असता त्याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला, परिणामी या प्रदर्शनातून हलाल चायनीज नावाचा फलक स्टॉलच्या मालकाने काढून टाकला.

halal7
‘हलाल’चा फलक लावलेला स्टाॅल

कोकण महोत्सवातील ‘हलाल मुंचाईस फूड कॉर्नर’ 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नेहरू मैदानात भव्य कोकण महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत येथे कोकण महोत्सव सुरु आहे. त्यामध्ये ‘हलाल मुंचाईस फूड कॉर्नर’ नावाचा स्टॉल लावल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर एकच खळबळ उडाली. आधीच मागील १५-२० दिवसांपासून राज्यभरात ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे आंदोलन जोर धरत आहे. हलाल प्रमाणित मांस सक्तीने हिंदूंना विकणारे मॅकडोनाल्ड, केएफसी, पिझ्झा हट यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने सुरु आहेत. अशारीतीने हलालच्या विरोधात अत्यंत वेगाने जागृती होत आहे. त्यातच डोंबिवली येथील कोकण महोत्सवातील ‘हलाल मुंचाईस फूड कॉर्नर’ या नावाचा स्टॉल हिंदुत्वनिष्ठांच्या नजरेत आला आणि हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या. काही तासांत याविषयी हिंदुत्वनिष्ठांचे आयोजकांना फोनवर फोन येऊ लागले. परिणामी या महोत्सवातून हलालच्या नावाचा फलक संबंधित स्टॉलच्या मालकाने काढून टाकला.

halal8
‘हलाल’च्या स्टाॅल वरील फलक हटवला

(हेही वाचा हिंदूंच्या धर्मांतरासाठी ॲमेझॉन पुरवते पैसा? राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची नोटीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.