ISRO ने रचला इतिहास, सर्वात वजनदार रॉकेट ‘LVM-3’ चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

178

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने शनिवारी रात्री 12.7 वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसाय़िक प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोचे LVM-3 हे रॉकेट हे यशस्वीरित्या प्रक्षेपित झाल्याने भारताने ग्लोबल कमर्शिअल लाँच मार्केटमध्ये एक नवा इतिहास रचल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले हे १२ धोकादायक अ‍ॅप्स; तुम्ही वापरत असाल तर लगेच करा Delete, वाचा संपूर्ण यादी)

इस्त्रोचे रॉकेट बाहुबली LVM-3 हे साधारण 36 व्यावसायिक रॉकेटसह आकाशात झोपावले. सतिश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून मध्यरात्री हे रॉकेट प्रक्षेपित केले गेले. तसेच एका खासगी उपग्रह कंपनी असलेल्या वन वेबच्या 36 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. यानंतर इस्त्रोचे वन वेब इंडिया-1 हे मिशन पूर्ण झाले असून भारतीयांसाठी ही मोठी दिवाळी भेट आहे.

LVM-3 रॉकेट यापूर्वी GSLV मार्क रॉकेट म्हणून ओळखले जात होते. या मिशनसाठी 24 तासांचा काऊंटडाऊन ठेवण्यात आला होता. या मिशनमध्ये ब्रिटिश स्टार्टअप वनबेवचे 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. LVM-3 हे रॉकेट 43.5 मीटर लांब असून 8 हजार किलोपर्यंत उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असेलला सर्वात मोठा वजनदार उपग्रह म्हणून ओळखला जातो. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात LVM-3 रॉकेटद्वारे 36 वनबेव उपग्रहांचा आणखी एक सेट लॉंच केला जाणार असल्याचे ही सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.