मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शनिवारी सांताक्रुझ डेपोतील बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले होते. यानंतर आज जोगेश्वरीतील मजास डेपोतील कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याची माहिती मिळत आहे. बोनस तसेच पगार वाढ या मागणीसाठी हे कर्माचारी आक्रमक झाले असून त्यांनी संपाची हाक दिली आहे. याच आंदोलनाची धग आता प्रतिक्षानगर आणि धारावी आगारापर्यंत येऊन पोहोचली आहे.
(हेही वाचा – ISRO ने रचला इतिहास, सर्वात वजनदार रॉकेट ‘LVM-3’ चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी)
काल मुंबईतील सांताक्रुझ बस डेपोतील ३०० कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर गेलेत. पहाटे ५ वाजेपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला यानंतर या डेपोमधून एकही बस डेपोमधून बाहेर पडली नाही. यानंतर मजार डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबईकरांना या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
समान काम – समान दाम, बोनस आणि इतर मुद्द्यांवर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आज रेल्वेचा मेगाब्लॉक अशताना मुंबईकरांना अपुऱ्या बस सेवेमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. ज्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले त्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करताना कंत्राटदाराने या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देखील दिले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
Join Our WhatsApp Community