सोनिया गांधींना मोठा धक्का, राजीव गांधी फाउंडेशनवर केंद्र सरकारकडून कारवाई

137

रविवारी केंद्र सरकारने गांधी परिवाराशी संबंधित एका एनजीओवर मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचा एफसीआरए ((Foreign Contribution (Regulation) Act) परवाना रद्द केला आहे. एफसीआरए अंतर्गत गृह मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. या संस्थेवर विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

(हेही वाचा – मनसेच्या राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं वक्तव्य; म्हणाले, “… तर आम्ही युतीसाठी तयार असू”)

गांधी कुटुंबाशी संबंधित राजीव गांधी फाउंडेशनही संस्था आहे. या फाउंडेशनवर विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून जुलै 2020 मध्ये गृह मंत्रालयाने ही चौकशी समिती स्थापन केली होती. राजीव गांधी फाउंडेशनच्या सोनिया गांधी या अध्यक्षा आहेत. तर इतर विश्वस्तांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचा समावेश आहे.

काय आहे राजीव गांधी फाउंडेशन

  • राजीव गांधी फाउंडेशनची स्थापना 1991 मध्ये झाली.
  • हे फाउंडेशन आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, दिव्यांगांना आधार यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करते.
  • 1991 ते 2009 या काळात फाऊंडेशनने शिक्षणाच्या विकासावर भर दिला होता.
  • 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्ये या संस्थेने शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.