टी-20 विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत चार गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो किंग कोहली. विराट कोहलीने या सामन्यात 53 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 83 धावांची आतषबाजी करत सगळ्यांची मनं जिंकली आणि भारतीयांची दिवाळी गोड केली.
विराटच्या या खेळीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील आनंदित झाली असून तिने विराटसाठी भावनिक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मला तुझा अभिमान असून मी तुझ्यावर आनंदात आणि संघर्षाच्या काळात असीमित प्रेम करत राहीन, असे अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अनुष्काने व्यक्त केल्या भावना
तू लोकांच्या आयुष्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुझ्या खेळीने एक नवा प्रकाश आणि नवचैतन्य आणलं आहेस. तुझी एकाग्रता, तुझी जिद्द आणि स्वतःच्या कामगिरीवरचा विश्वास केवळ भन्नाट आहे. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सामना आपण आज पाहिला आहे. आपली आई इतका जल्लोष का करतेय हे कळण्याच्या वयात आपली मुलगी आता नाही. पण जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला कळेल की तिच्या बाबाने त्यादिवशी त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली होती तिही त्याच्यासाठी खडतर ठरलेल्या काळानंतर. कठीण परिस्थितीला जिगरबाज वृत्तीने तोंड जेत त्याने ही कामगिरी केली आहे, असे अनुष्काने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
मला तुझा अभिमान वाटतो विराट. तुझ्यावर असीमित प्रेम करतच राहीन, आनंदातही आणि संघर्षाच्या काळातही, अशा शब्दांत अनुष्काने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community