वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले आहेत, त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील 27 गाड्या दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. तर 6 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा : महावितरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड, असा करा अर्ज)
रेल्वेकडून हाती आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवासी वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे. रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावरील 6 गाड्या रद्द केल्या असून 27 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक गाड्या पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या दुर्घटनेमुळे नागपूर मुंबई मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- वर्धा : भुसावळ एक्सप्रेस
- नागपूर : सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
- नागपूर : अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस
- गोंदिया : कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- नागपूर : पुणे एक्सप्रेस
- अजनी : अमरावती एक्सप्रेस