सुदानमध्ये गेल्या काही दिवसांपासून आदिवासीयांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत २०० लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महिलांसह बालकांचाही समावेश आहे. सुदानमधील दोन आदिवासी गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर संघर्षामध्ये झाले.
(हेही वाचा – आशा वर्कर्सना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार)
मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी या संघर्षाला सुरूवात झाली असून दक्षिण सुदान येथील ब्लू नाईल प्रातांत दोन आदिवासी गटात वाद झाला. गेल्या आठवड्यात साधारण ५० जण ठार झाले. हा संघर्ष असाच सुरू राहिला तर आणखी लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे.
गेल्या काही दिवसांत सुदानच्या ब्लू नाईल प्रातांत अशा प्रकारच्या जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या मते, ऑक्टोबरच्या सुरूवातीला अशा प्रकारचा हिंसाचार झाला होता. त्यावेळी १५० लोक मारले गेले होते. हा हिंसाचार रोखण्यासाठी लष्कर आणि प्रशासनाचे लोक शर्थीचे प्रयत्न करत असले तरी देखील हिंसाचार थांबलेला नाही. त्यामुळे सुदान येथे आणीबाणी जाहीर केल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community