मुंबईतील रेल्वे प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी ३ अ अंतर्गत कांदिवली, मिरारोड, कसारा, नेरळ या चार रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या तीन वर्षांमध्ये रेल्वे प्रवाशांना या ४ स्थानकांवर आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
( हेही वाचा : पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ‘या’ दिग्गजांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा! )
४ स्थानकांचे रुपडे पालटणार
- प्रशस्त डेक
- पूर्व-पश्चिम मार्ग जोडणारे पूल
- प्रवासी मागणीनुसार तिकीट खिडक्या
- अन्य प्रवासी सुविधा
३६ महिन्यांत ४ स्थानकांचा कायापालट
कांदिवली स्थानकात बोरिवली स्थानकाच्या धर्तीवर सुधारणा करण्यात येतील. कांदिवली स्थानकाच्या पश्चिम दिशेला १०.३ मीटर रुंदिचा प्रशस्त डेक उभारण्यात येईल. मीररोड स्थानकातील सध्याचे तिकीट घर, आरक्षण कार्यालय अन्यत्र हलविले जाणार आहे.
एमयूटीपी ३अ अंतर्गत सुधारणा प्रकल्पाचे काम दिवाळीनंतर सुरु करण्यात येणार आहे. ३६ महिन्यांत या ४ स्थानकांचे काम पूर्ण होईल. मात्र यातील काही सुविधा सुरूवातीच्या १८ महिन्यातच प्रवाशांना उपलब्ध होतील असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community