दिवाळीनंतर सोने आणखी महागणार?

170

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आता सोन्याचे भाव जवळपास ५२ हजार आहेत हेच दिवाळीनंतर ५३ हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता सराफ बाजाराने व्यक्त केली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सोने महागणार असल्याने आता दिवाळीदरम्यानच ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे.

( हेही वाचा : सिडकोकडून सर्वसामान्यांना दिवाळी गिफ्ट! 7849 परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची घोषणा, या तारखेपासून नोंदणी सुरू होणार )

सोने महागण्याची शक्यता 

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून युद्धा सुरू आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेचे व्याजदर या घटकांवर सध्या सोन्याचे भाव अवलंबून आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सुद्धा सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो. त्यामुळे सोन्याचे भाव सातत्याने कमी अधिक होत आहेत.

गेल्या दोन वर्षांमध्ये सोन्याचे भाव ४८ हजारांपासून ५५ हजारांदरम्यान वरखाली होत आहेत. सराफ बाजाराने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार दिवाळीनंतर सोन्याचा भाव आणखी वाढणार आहे.

सोने कुठून येते

सरकार जे सोने आयात करते ते सर्वप्रथम झवेरी बाजारात येते. झवेरी बाजारातील व्यापारी सरकारकडून सोने खरेदी करतात. येथूनच सोन्याचे वितरण होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.