केतकी पुन्हा भडकली; म्हणाली, “… आणि धर्माची माती करु नका”

126

मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे चांगलीच चर्चेत असते. केतकी चितळे मूळची पुण्याची रहिवासी असून ती आपल्या संस्कृतीबद्दल नेहमीच जागरूक असते. नुकतेच तिने मराठी सणांच्या शुभेच्छा देताना त्या कशापद्धतीने द्यायल्या हव्यात हेही सांगितले आहे. त्यामुळे केतकीची ही पोस्टही भलतीच व्हायरल होत आहे.

काय म्हणाली केतकी

हिंदू संस्कृतीत सण आणि उत्सवाच्या शुभेच्छा देताना आपण हॅप्पी दिवाळी न म्हणता शुभ दीपावली असे म्हणायला हवे असे केतकीचे म्हणणे आहे. तिने आपल्या पोस्टमधून शुभेच्छा देताना आपण जे इमोजी वापरतो ते चीनमध्ये नववर्षासाठी वापरले जातात. असेही म्हटले आहे. त्यामुळे आपण ते वापरताना काळजी घ्यावी.

(हेही वाचा – “रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ‘तिरंगा’ बनला भारतीयांचे सुरक्षा कवच”)

तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने असे म्हटले की, प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका. आपण जेव्हा हॅप्पी लिहितो तेव्हा शुभेच्छा आणि हॅप्पी या दोन्ही शब्दांमध्ये खूप अंतर आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. असे काही करुन आपण आपल्या धर्मामध्ये अंतर निर्माण करु नये, असे आवाहनही केतकीने या पोस्टद्वारे केले आहे.

6771d78a 90f7 4c07 a667 f9322807c7f8

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.