केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेच्या आणखी एकाला एटीएसने जळगावातून ताब्यात घेतले आहे. पीएआयशी संबंधित असलेल्या आणि दहशतवादी कारवाया करणारे लोक हे सध्या चांगलेच रडारवर आले आहेत. ज्या संशयितांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे त्यांचे मोबाईल फॉरमॅट करणा-याच्या एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून 14 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुरावे नष्ट करण्याचे करत होता काम
उनैस उमर खय्याम पटेल असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याने पीएफआयशी संबंधितांकडे असलेले पुरावे नष्ट करण्याचे काम केल्याचे सांगितले जात आहे. पटेलच्या काही संशयित ऑडिओ क्लिपदेखील एटीएसच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे आता त्याची एटीएसकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे. नुकतेच एटीएसने नाशिक येथील मालेगावात मोठी कारवाई करत पीएफआयशी संबंधित सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना न्यायालयीन कोढडीत ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचाः रवी राणा म्हणतात, मी फडणवीसांचा सच्चा शिपाई)
करत होता फॉरमॅटिंग
पटेल हा देशविघातक कृत्य करणा-या संशयितांचे डेटा फॉरमॅटिंग करत होता. त्यांच्या मोबाईल,लॅपटॉपमधील काही महत्वाचे पुरावे त्याने नष्ट केल्याचा एटीएसला संशय आहे. नाशिक एटीएसने ताब्यात घेतलेल्या संशयितांचे मोबाईल,लॅपटॉप फॉरमॅट झाल्यामुळे एटीएसला संशय आला आणि त्यांनी तपास केला असता त्यात पटेलचे नाव समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community