उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबाद दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका देखील केली. त्यांच्या या टीकेला आता विरोधकांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर कायमंच टीका करणा-या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या या दौ-यावरुन देखील निशाणा साधला आहे. नुकसानग्रस्त बांधाची पाहणी करणं म्हणजे रस्त्यावर उभे राहून मुलाखत देणं नसतं, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी ठाकरेंवर केली आहे.
(हेही वाचाः रवी राणा म्हणतात, मी फडणवीसांचा सच्चा शिपाई)
बांधावरुन तरी राजकारण करू नये
दिवाळी हा वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे. उद्धव ठाकरे यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पण बांधाच्या नावावर राजकारण नको, असं मला तरी कळतं. बांधाच्या नुकसानाची पाहणी करायची म्हटल्यावर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांचे किती नुकसान झाले हे पाहणे गरजेचे असते. बांधाची पाहणी करणं म्हणजे केवळ रस्त्यावर उभे राहून मुलाखत देणे नसते, असा खोचक टोला खासदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सोमवारी अमरावती येथे गरीब गरजू तसेच अंध आणि अपंगांना दिवाळी भेट देत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी देखील कौतुक केले. त्यामुळे हे सरकार गोर गरीबांचे कल्याण करणारे आहे, असेही नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community