म्यानमारमध्ये अल्पसंख्यांकांवर 4 बॉम्ब टाकले, 60 जण जळून खाक

192

म्यानमारमधील वांशिक अल्पसंख्यांक वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यामध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्लात गायक आणि संगीतकारांसह 60 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काचिन वांशिक अल्पसंख्याक गटाच्या मुख्य राजकीय संघटनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला अनेक लोक उपस्थित होते. त्याचवेळी हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर त्याच गटातील सदस्यांनी आणि बचाव पथकातील कर्मचा-यांनी या हल्ल्याची माहिती दिली.

या हल्ल्याबाबत काचिन आर्टस असोसिएशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, रविवारी रात्री झालेल्या हवाई हल्ल्यात 60 लोक ठार झाले आहेत. तर 100 हून अधिक जखमी झाल्याचे वृ्त्त समोर आले आहे. या हल्ल्यानंतर म्यानमारमधील वाढत्या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आग्नेय आशियाई देशांचे परराष्ट्र मंत्री इंडोनेशियामध्ये विशेष बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

( हेही वाचा: रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले, “मनसेच्या युतीची गरज…” )

सुरक्षा दलांनी बळाचा वापर केल्याचा आरोप 

मागच्या वर्षी झालेल्या लष्करी उठावानंतर रविवारी रात्री एका समारंभात झालेल्या हवाई हल्ल्यात चार बाॅंब टाकल्याने 60 जण त्यामध्ये ठार झाले आहेत. लष्करी किंवा राज्य माध्यमांकडून या हल्ल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. म्यानमारमधील संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, हवाई हल्ल्याच्या या कृतीमुळे त्यांनी दु:ख आणि चिंता व्यक्त केली आहे. नि:शस्त्र नागरिकांविरुद्ध सुरक्षा दलांनी आपल्या बळाचा वापर करुन त्यांच्यावर हल्ला करणे हे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

म्यानमारमधील वांशिक अल्पसंख्याकांच्या स्वायत्ततेच्या मागण्या अनेक दशकांपासून मान्य करण्यात आल्या नाहीत. काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशनच्या स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी त्या ठिकाणी साजरे केले जात होते. ज्याचा उपयोग काचिनच्या लष्करी शाखेकडून लष्करी प्रशिक्षणासाठी केला जातो. हे म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यांगूनपासून सुमारे 950 किमी अंतरावर हपाकांत प्रदेशात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.