लांबलेल्या पावसाने ऑगस्टपर्यंत मिटवली मुंबईकरांची पाण्याची चिंता

134

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या १ कोटी ४१ हजार २१३ कोटी लिटर अर्थात  १४ लाख १२ हजार १३४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा आहे. सर्व तलावांमधील एकूण पाणी साठ्याच्या ९७.५७ टक्के एवढा असून १ ऑक्टोबर रोजी हा एकूण साठा ९८.५७ टक्के एवढा होता.मात्र, १ ऑक्टोबर २०२२ मध्ये सर्व तलाव आणि धरणांमध्ये जमा झालेल्या एकूण साठ्याच्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांत कमी पाणी साठा होता, परंतु २४ ऑक्टोबरमध्ये मागील तीन वर्षांमधील पाणी साठ्याचा अंदाज घेतल्यास यावर्षी सर्वांधिक पाणी साठा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या लांबलेल्या पावसाने मुंबईकरांची ऑगस्टपर्यंतची चिंता मिटवली आहे. एरव्ही ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल इतका साठा जमा होत असला तरी यंदा मात्र तो ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणी साठा जमा झाला असल्याचे दिसून येत आहे.

मागील काही दिवसांमध्ये  परतीच्या पावसाची मुसळधार बरसात झालेली आहे. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याची पातळी वाढलेली पहायला येते. जिथे २४ ऑक्टोबरपर्यंत एकूण साठ्याच्या तीन ते साडेतीन टक्के पाणी साठा घटला जातो, तिथे यंदा पावसामुळे केवळ १ टक्काच पाणी साठा कमी झाल्याचे पहायला मिळत असून सर्वांत कमी असलेला पाणी साठ्याने यंदा मागे राहून ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात मागील दोन वर्षांपेक्षाही अधिक पाणी साठ्याचा उच्चांक दाखवून दिला आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलाव परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने मोडकसागर, तानसा, तुळशी, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या तलावांमध्ये यंदा ऑगस्ट महिन्यातच पुरेसा पाऊस पडून तलावांच्या पाण्याची पातळीत वाढ झाली होती. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १ ऑक्टोबरपर्यंत तलावांमध्ये जमा होणाऱ्या जलसाठ्यावर अंदाज बांधला जातो. त्यामुळे १ ऑक्टोबरला यासर्व तलावांमध्ये एकूण पाण्याची पातळी ही ९८.५७ टक्के एवढी नोंदवली गेली होती. मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा आवश्यक असतो. त्यातुलनेत यासर्व तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख २६ हजार ६६५ दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला होता. हा साठा पुढील ३८० दिवस पुरेल इतका असला तरी मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा एकूण साठा कमी नोंदवला गेला होता.

परंतु २४ ऑक्टोबर रोजी तलाव पातळीची अंदाज घेतला असला असता,यावर्षी १४ लाख २१ हजार १३४ दशलक्ष लिटर(९७.५७ टक्के) एवढा पाणी साठा असल्याचे पहायला मिळाले आहे, जे १ ऑक्टोबर २०२२ रोजी  १४ लाख २६ हजार ६६५ दशलक्ष लिटर(९८.५७ टक्के ) एवढे होते. पण सन २०२१मध्ये  : १४ लाख ०३ हजार ५६७ दशलक्ष लिटर(९६.९७टक्के) एवढे आहे, तर १ ऑक्टोबर २०२१ रोजी हे सन १४ लाख ३६ हजार १८३ दशलक्ष लिटर(९९.२३ टक्के ) एवढे होते.

तर सन २०२० मध्ये सध्या १३ लाख ७८ हजार ९७७ दशलक्ष लिटर(९५.२८टक्के) एवढ्या पाणी साठ्याची नोंद झाली, तर १ ऑक्टोब २०२०मध्ये १४ लाख ३० हजार ६०९ दशलक्ष लिटर(९८.८४टक्के) एवढा होता. जर मागील दोन वर्षांची  १ ऑक्टोबर रोजीची पाण्याची पातळी पाहिली तर २४ ऑक्टोबरच्या तुलनेत तीन ते साडेतीन टक्क्यांनी पाण्याची पातळी कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे २४ ऑक्टोबरपर्यंत एकूण पाणी साठ्यातील तीन ते साडेतीन टक्के पाणी साठा कमी होत असतो. परंतु यंदा तलावातील पाण्याच्या पातळीत केवळ १टक्का घट झाल्याचे पहायला मिळत आहे.

( हेही वाचा Cyclone Sitrang: पूर्व किनारपट्टीवरील सितरंग चक्रीवादळाची तीव्रता वाढली, पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांना हाय अलर्ट )

विशेष म्हणजे जिथे पाण्याच्या पातळीत १ ऑक्टोबर रोजी मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाचा पाणी साठा कमी असला तरी २४ ऑक्टोबर रोजी तो मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक कमी होणे आवश्यक होते. परंतु यंदा प्रथमच १ ऑक्टोबर नंतरही पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे पहायला मिळत असून या वाढ झालेल्या पाण्याच्या पातळीने मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक जलसाठ्याचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केला दिसून येत आहे. त्यामुळे हा वाढलेला पाणी साठा मुंबईकरांची ऑगस्टपर्यंतची तहान भागवणारा ठरणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली असून अनेक गावांमध्येही पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे लांबलेल्या पावसाने मुंबईकरांचे पाणी संकट दूर केल्याचे आकडेवारीवरून पहायला मिळत  आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.