कोरोना महामारीचे सावट दूर झाल्यानंतर आता सणासुदीच्या काळात भारतातील ग्राहक ऑनलाईन आणि स्टोअर्समध्ये खरेदी करत असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली आहे. कोरोना महामारी आणि लाॅकडाऊनंतर ही पहिलीच दिवाळी आहे. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान होण्याचे काही सकारात्मक संकेत मिळत आहेत.
नव्या वाहनांची विक्रीत मागील वर्षांपासून 57 टक्के वाढली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशच्या डेटामधून पुढे आली आहे. भारतात दुचाकीची विक्री 2019 च्या तुलनेत ग्रामीण भागात 3.7 टक्क्यांनी वाढली. कार आणि स्पोर्टस युटिलिटी वाहनांची मागणी मागील वर्षीच्या सप्टेंबरपासून 92 टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सने दिली.
( हेही वाचा: मुंबई पोलिसांचा मोफत ‘बेस्ट’ प्रवास बंद; प्रवासी भत्त्याचा मार्ग मोकळा )
बॅंक कर्जात वाढ
- अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे वाणिज्यिक क्षेत्रात कर्ज घेणा-यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बॅंकांनीही मुक्त हस्ते कर्जवाटप केले. 2014 नंतर प्रथमच यंदा कर्जवाटप 16 टक्क्यांनी वाढल्याचे आकडे सांगतात.
- अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट यांच्यासारख्या ऑनलाईन विक्रेत्यांनी 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरदरम्यान, 27 टक्के विक्री नोंद केली आहे.
- 2.5 लाख कोटींनी दुकानांमधील विक्री वाढीची शक्यता आहे.
- देशातील प्रवासी विमान वाहतूक कोरोनापूर्व काळाएवढी पूर्वरत होताना दिसत आहे.