मोबाईल दुरुस्त करायला दिला आणि खात्यातून लाखो रुपये झाले गायब; ‘ही’ एक चूक पडली महागात

163

मोबाईल रिपेअर करण्यासाठी देणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. साकीनाका येथे राहणा-या एका व्यक्तीच्या बॅंक खात्यातून 2 लाख 20 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

पंकज कदम यांचा फोन खराब झाल्याने, त्यांनी एका रिपेअरिंग स्टोअरमध्ये दिला होता. तिथल्याच एका कर्मचा-यांना त्यांचे बॅंकिंग अॅप अॅक्सेस केले व त्यांच्या मुदत ठेवी मोडल्या आणि रक्कम लंपास केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

( हेही वाचा: वसईत फटाक्यांमुळे एकाच दिवसात 6 ठिकाणी आग लागल्याच्या घटना )

फोनबद्दल विचारले असता दिली उडवाउडवीची उत्तरे

7 ऑक्टोबरला फोनमधील स्पीकर खराब झाल्याने मी फोन दुरुस्त करण्यासाठी एका दुकानात दिला होता. तेव्हा तिथल्या कर्मचा-याने मला सिमकार्ड फोनमध्येच ठेवण्यास सांगितले. त्यानंतर दुस-या दिवशी 8 ऑक्टोबरला मी दुकानात गेलो तेव्हा ते बंद होते. सलग तीन दिवस दुकान बंद होते. या तीन दिवसांत मी सातत्याने दुकानात जात होतो. फोन दुरुस्त करायला दिल्याने आणि सिमकार्डही नसल्याने ऑफिसचे काम करण्यास अडचणी येत होत्या. 11 ऑक्टोबर रोजी दुकान उघडले पण दुकानातील व्यक्ती दुसराच होता. कदम यांनी त्याला फोनबद्दल विचारले तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कदम यांना संशय आला.

एका मित्राच्या मदतीने त्यांनी बॅंकिंग अॅपच्या सहाय्याने बॅंक खाते तपासले आणि त्यांना धक्काच बसला. कदम यांच्या बॅंक खात्यातून 2 लाख 20 हजार काढण्यात आले होते. फिक्स डिपाॅझिट मोडून ही रक्कम दुस-या व्यक्तीच्या खात्यात वळती करण्यात आली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कदम यांनी लागोलाग साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.