देशातील काही राज्यांमध्ये रोखीच्या प्रमाणात प्रचंड असुंतलन असल्याचे समोर आले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा , राजस्थान आणि पंजाब यांचा या राज्यांत समावेश असून, बाजारातून कर्ज घेण्याऐवजी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या विशेष अल्पकालीन रोख सुविधेचा ते वारंवार लाभ घेत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आरबीआयने व्यक्त केली आहे.
आरबीआयने एका अहवालातून याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, मणिपूर, मिझोराम आणि नागालॅंड ही राज्येदेखील या सुविधेचा वारंवार लाभ घेत आहेत.
( हेही वाचा: ‘या’ ब्रॅंण्डचे प्राॅडक्ट वापरल्याने कॅंसर? कंपनीविरोधात खटला दाखल )
राज्यांनी वारंवार घेतला लाभ
ऑगस्टपर्यंत या राज्यांनी 3.2 ते 4.2 टक्के सरासरी दराने विशेष सुविधेचा लाभ घेतला आहे. बाजारातून कर्ज घेण्यापेक्षा ही सुविधा स्वस्त पडते. त्यामुळे राज्यांचा कल याकडे आहे. विशेष सुविधा तात्पुरत्या स्वरुपात वापरण्यासाठी असून, वारंवार वापरणे धोकादायक असल्याचे आरबीआयने यापूर्वी स्पष्ट केले आहे.
या राज्यांबाबत आरबीआयने व्यक्त केली चिंता
आंध्र प्रदेश, बिहार, हरयाणा, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल
Join Our WhatsApp Community