सर्वाधिक लोकप्रिय असलेले सोशल मीडिया अॅप्लिकेशन व्हॉट्सअप अनेक भागात डाऊन झाल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत व्हॉट्सअपकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अनेक युजर्ससाठी व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचे दिसून आले. अनेक युजर्संनी ट्विटरवर याबाबत समस्या मांडल्या आहेत. हे व्हॉट्सअप डाऊन झाल्याने कोणताही युजर्स कोणालाही मेसेज आणि मीडिया फाइल्स पाठवू शकत नाहीत. व्हॉट्सअॅपच्या मूळ मेटाने अद्याप या समस्येचे निराकरण केल्याचे समोर आले नाही.
(हेही वाचा – WhatsApp होणार बंद; ‘या’ यादीत तुमचा स्मार्टफोन तर नाही ना?)
सुरूवातीला इंटरनेटची समस्या असल्याने युजर्सने व्हॉट्सअपच्या गोंधळाकडे लक्ष दिले नाही. मात्र इतर वेबसाईट नीट सुरू असल्याने फक्त व्हॉट्सअपवर मेसेज येत-जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. तोपर्यंत सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारी सोशल मीडियावर येऊ लागल्या. तर काही वेळात ट्विटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाल्याचे दिसून आले.
WhatsApp services have been down for the last 30 minutes. pic.twitter.com/9WL4mMFTRO
— ANI (@ANI) October 25, 2022
मंगळवारी, दुपारी बारा वाजेपासून व्हॉट्सअप डाऊन असल्याने लाखो युजर्सला अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात व्हॉट्सअप डाऊन झाल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय येत आहे.
Join Our WhatsApp Community