श्रीकांत शिंदे यांनीही घेतली राज ठाकरेंची भेट, महायुतीच्या चर्चांना पुन्हा उधाण

134

राज्यात सध्या भाजप-मनसे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महायुतीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यातच आता मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील मंगळवारी राज ठाकरे यांची शिवतीर्धावर भेट घेतली आहे. त्यामुळे आता युतीबाबत नक्कीच काहीतरी शिजत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच मनसेच्या डोंबिवली येथील कार्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील महायुतीबाबत सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे महायुतीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

(हेही वाचाः ‘आमची मनं जुळलेली आहेत, फक्त…’, महायुतीबाबत मनसे आमदाराचे सूचक विधान)

राजू पाटील यांचे वक्तव्य

युती करायची की नाही हा निर्णय सर्वस्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आहे. त्यांनी सध्या आम्हाला स्वतंत्र लढण्याचे आदेश दिले असून त्यानुसार आम्ही तयारी सुरू केली आहे. जर राज ठाकरे यांनी भविष्यात युतीसोबत जायला सांगितलं तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत. इथे आमची मनं जुळली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सारं काही जुळून येईल, असे विधान राजू पाटील यांनी महायुतीबाबत बोलताना केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.