मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे यंदाही ‘माझी मेट्रो फेस्टिव्हल २०२२’ चे आयोजन करण्याच आले आहे. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने स्पर्धक, कलाकारांना मेट्रो सजवण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना १८ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार असून यासंबंधित सर्व माहिती MMOPL च्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
( हेही वाचा : ‘या’ ब्रॅंण्डचे प्राॅडक्ट वापरल्याने कॅंसर? कंपनीविरोधात खटला दाखल )
माझी मेट्रो फेस्टिव्हल उपक्रम
मेट्रो १ सुरू झाल्यापासून एमएमओपीएलकडून ‘माझी मेट्रो फेस्टिव्हल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा या महोत्सवाचे आठवे वर्ष असून या महोत्सवाच्या माध्यामतून कलाकार आणि सामान्य नागरिकांना मेट्रो गाडी, मेट्रो स्थानक आणि मेट्रोच्या परिसरात चित्र रेखाटण्याची, सजविण्याची संधी उपलब्ध करण्यात येते. संकल्पेनेच्या आधारावर चित्रांचा आराखडा मागविण्यात येतो, यंदा ट्रेन डेकल डिझाइन ही संकल्पना आहे. यातून काही विजेत्यांची निवड करण्यात येते आणि संबंधितांच्या चित्रांनी स्थानक किंवा मेट्रो गाड्या सजविण्यात येतात.
या महोत्सवाची नोंदणी १८ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून १८ नोव्हेंबरपर्यंत याची नोंदणी करण्यात येणार आहे. २२ डिसेंबरला विजेत्यांची नावे घोषित करण्यात येणार आहेत. २७ डिसेंबरला या विजेत्यांच्या चित्रांनी मेट्रो गाड्या सजवण्यात येतील अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community