राज्यात गेल्या काही दिवासांपासून राजकीय घडामोडी वेगाने होत आहे. राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा कधी पार पडणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची आस धरून बसलेल्यांना मोठा दिलासा दिला आहे.
राज्यातील शिंदे सरकारला तीन ते साडेतीन महिने झाले आहेत. या साडेतीन महिन्यात फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. अजूनही मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला कधी संधी मिळतेय, याकडे आमदारांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
(हेही वाचा – WhatsApp Down: युजर्स ‘मेटा’कुटीला आल्यानंतर WhatsApp ची सेवा सुरू)
नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावर भाष्य केले. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? असा सवाल केला असता ते म्हणाले, होईल ना. योग्यवेळी सर्व गोष्ट होत राहतात. या विस्तारात विदर्भाला स्थान मिळेल का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वीच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community