भारतीय संघ सिडनीमध्ये दाखल झाला आहे. सध्या दिवाळी सण सुरु आहे. भारतातच नाही, जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करतात. टीम इंडियाच्या खेळाडूंनीसुद्धा कुटुंबीयांसह उत्साहात दिवाळी साजरी करण्याचे ठरवले होते.
भावनांमध्ये वहावत जाऊ नका, मोठ्या लक्ष्यावर लक्ष केंद्रीय करा
मेलबर्नमध्ये पाकिस्तानवर मिळवलेला रोमांचक विजय आणि दिवाळी सण असे दोन्ही गोष्टींचे एकत्र सेलिब्रेशन करण्याची योजना होती. परंतु, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याकडून टीमला एक मेसेज देण्यात आला. पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करु नका, असा तो संदेश होता. त्यामुळे टीम इंडियाची दिवाळी पार्टी रद्द झाली आहे. भावनांमध्ये वहावत जाऊ नका, मोठ्या लक्ष्यावर लक्ष केंद्रीय करा, असा मेसेज विराट, रोहितकडून देण्यात आला आहे.
( हेही वाचा: ‘या’ दहा राज्यांनी मोडली आर्थिक शिस्त; ओढावू शकते आर्थिक संकट, RBI ने व्यक्त केली चिंता )
स्पर्धा अजून संपलेली नाही
भारतीय संघाला पुढच्या सामन्याचा विचार करा. तसेच, दिर्घकालीन उद्धिष्ट्य लक्षात ठेवा. चांगली सुरुवात झाली आहे. सातत्य आणि चांगली कामगिरी करायची आहे. स्पर्धा अजून संपलेली नाही. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवा, मॅच नंतरच्या बैठकीत खेळाडूंना हे सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community