समान काम-समान वेतन, दिवाळी बोनस आदी मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध आगारांमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनाची व्याप्ती सोमवारी वाढली. सोमवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिंडोशी, मरोळ आगारामध्ये सुद्धा कामबंद आंदोलन सुरू केले होते. ऐन दिवाळीत बस बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. यामुळे कंत्राटी कर्मचारी आणि कंत्राटदारांवर बेस्ट उपक्रमाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
( हेही वाचा : जगभरात #WhatsAppDown; युजर्सनी भन्नाट मीम्स बनवत केले ट्रोल )
कारणे दाखवा नोटीस
बेस्टमध्ये भाडेतत्वावर बस आणि कंत्राटी चालक पुरवठा करणाऱ्या मे हंसा सिटी बस चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. २४ ऑक्टोबरला कर्तव्यावर हजर न राहता बेस्ट व्यवस्थापना विरूद्द जमाव करून घोषणाबाजी केली तसेच कामावर हजर होत असलेल्या कामगारांना काम करण्यापासून मनाई केल्याने मरोळ आगारातील ५४ बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या प्रवाशांना उपलब्ध करून देता न आल्याचे सांगून कारणे दाखवा नोटीस या कंत्राटी चालकांना बजावण्यात आली आहे.
३ कंत्राटदारांच्या माध्यामातून भाडेतत्वावरील सेवा
सध्या हंसा सिटी बस सर्व्हिसेस प्रा. लि, मातेश्वरी कंपनी, डागा व एमपी ग्रुप अशा चार कंत्राटदाराच्या माध्यमातून या बसेस चालवण्यात येतात. मात्र कंत्राटी कामगारांना वेतन देणे परवडत नाही म्हणून एमपी ग्रुपने सेवा देणे बंद केले असून उर्वरित ३ कंत्राटदाराच्या माध्यमातून भाडेतत्वावरील बस चालवण्यात येतात.
Join Our WhatsApp Community