एसटीवर अनधिकृत जाहिराती लावल्यास होणार कठोर कारवाई!

195

राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या बसेसवर अनेक लोक अनधिकृत स्टिकर्स लावत जाहिरातबाजी करतात. त्यामुळे एसटी बसेसचे विद्रुपीकरण होते अशा जाहिरातबाजांवर एसटीच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येणार असून दंड सुद्धा वसून केला जाणार आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे.

( हेही वाचा : बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; चालकांना कारणे दाखवा नोटीस )

एसटी बसचे विद्रूपीकरण केल्यास कारवाई

एसटीचे जाळे संपूर्ण राज्यभरात पसरले आहे. अनेकांकडून जाहिरातबाजीसाठी एसटीवर अनधिकृत स्टिकर्स लावले जातात. किंवा एसटीच्या आतील व बाहेरील बाजूला पॅम्पलेट चिकटवण्यात येतात यामुळे एसटी बसचे विद्रूपीकरण होते. यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

कठोर कारवाईची मागणी 

आतापर्यंत एसटीमधील अनधिकृत पॅम्पलेट, स्टिकर्स, जाहिराती कर्मचारी काढून टाकत होते. मात्र आता या संदर्भात जाहिरातदाराची तक्रार पोलिसांत करण्यात येणार आहे. यासोबतच दंडही वसून केला जाईल असे एसटीच्या नागपूर विभाग प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. महापालिकेने अशा विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.